राशीन येथे फुले व आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व रक्तदान शिबिराआयोजित.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती राशीन यांच्या वतीने शनिवार दिनांक ११/४/२०२६. रोजी सकाळी दहा वाजता राशीन व परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच रविवार दिनांक.१२ एप्रिल २०२६. रोजी सकाळी दहा वाजता निळा झेंडा चौक राशीन येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अंबादास पिसाळ, नामदेव (देवा) राऊत., संभाजीराजे राजेभोसले,निलेश गायकवाड, रोहन कदम, रामकिसन साळवे, संजय चव्हाण, नितीन साळवे, एडवोकेट दत्तात्रय चव्हाण, माजी मुख्याध्यापक विजयकुमार साळवे , दत्ता गोसावी, ,डॉ.विलास राऊत, अतुल राऊत, माऊली सायकर,व इतर उपस्थित भीमसैनिक व मान्यवरांच्या हस्ते करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. असंख्य रक्तदात्यांनी भीमसैनिकांनी व इतर नागरिकांनी यावेळी रक्तदान केले.रक्तदान शिबिरासाठी मलिकार्जुन ब्लड बँक सोलापूर येथील डॉक्टर सुमित कटाळे, आनंद गवळी, लक्ष्मी स्वामी, अर्चिता सुरवसे, सिद्धी मोरे, सहकार्य लाभले.लाभले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन .मा. अमोल ( दादा) चव्हाण मित्रपरिवार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष कमलेश भाऊ साळवे मित्र परिवार राशीन यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राध्यापक विकी साळवे सर यांनी मानले.




