pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुका आजी-माजी सैनिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी भाऊसाहेब रानमाळ; सचिवपदी सुनील साळुंके

Samrudhakarjat
4 6 9 4 1 2

कर्जत : देशसेवेत आपले आयुष्य अर्पण केलेल्या आजी-माजी सैनिकांच्या सन्मान, हक्क आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या कर्जत तालुका आजी-माजी सैनिक संघटनेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच कर्जत येथील हॉटेल साई येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली असून, उपस्थित सर्व सैनिकांनी एकजुटीचा संदेश दिला.

बैठकीला तालुक्यातील विविध भागांतील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठी केलेल्या सेवेमुळे एकमेकांशी जोडले गेलेले हे सर्व सैनिक पुन्हा एकदा संघटनेच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय होण्याचा संकल्प व्यक्त करताना दिसून आले.

यावेळी अध्यक्षपदी भाऊसाहेब रानमाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्षपदी राम सुपेकर, सचिवपदी सुनील साळुंके, सहसचिवपदी जालिंदर जमदाडे, तसेच खजिनदारपदी सुनील भवर यांची निवड करण्यात आली.

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सतीश सुपेकर, बाळासाहेब धावडे, शिवांजली खोसे, प्रमोद बनकर, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब आगवन, सुधीर कर्पे, दिलीप धोदाड, भाऊसाहेब सुरवसे आणि राजू तोरडमल यांची निवड करण्यात आली. याशिवाय कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड.रामदास पुराणे यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “देशसेवा ही आमची ओळख असून, आता समाजसेवा हीच आमची जबाबदारी आहे. आजी-माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

बैठकीदरम्यान संघटनेच्या आगामी उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे, आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान, तसेच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

संघटनेने यापूर्वीही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले असून, त्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.

या बैठकीने संघटनेला नवचैतन्य मिळाले असून, कर्जत तालुक्यात आजी-माजी सैनिकांच्या एकजुटीचे आणि सेवाभावाचे नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून सैनिकांच्या सन्मानासाठी आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker