pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

संविधानाचा देखावा, विचारांचा जागर; कुळधरणमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिमाखात

समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश; कुळधरणमध्ये आंबेडकर जयंती जल्लोषात

Samrudhakarjat
4 6 9 6 0 5

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावात सामाजिक ऐक्य, समता आणि संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देत हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर भारतीय संविधानाची प्रत सादर करण्यात येत आकर्षक देखावा साकारण्यात आला. या देखाव्याद्वारे संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्जत तालुका दूध संघाचे अध्यक्ष मा. मंगेश (दादा) जगताप यांनी भूषवले. यावेळी सरपंच अनिता ताई जगताप, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आजच्या समाजात किती मोठा प्रभाव आहे, यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संयोजन ऋषिकेश गजरमल, विकास गजरमल, लखन गजरमल, सिद्धार्थ गजरमल, अजय गजरमल, अमोल भवाळ, अक्षय खवळे, हनुमंत जगताप, रोहित भवाळ, अरुण तांबे, मुरलीधर गजरमल, तेजस चव्हाण, प्रवीण गजरमल आदींनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कुळधरण गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या विचारांचा संदेश या जयंती सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker