“जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू नये”
आर. पी. आय. (आठवले) उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांची मागणी


कर्जत (प्रतिनिधी) :- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आर. पी. आय. (आठवले) उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत दादा पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. “देशात जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
शशिकांत दादा पाटील म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये अनेक घटक असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. जातीनिहाय जनगणनेतून अचूक आकडेवारी समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणासारखा संवेदनशील निर्णय घेणे योग्य ठरेल.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी. अनुसूचित जातींतील सर्व घटकांना समान न्याय मिळावा, यासाठी सरकारने सर्व संबंधित पक्ष आणि समाजघटकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.
सध्या राज्यात जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना शशिकांत दादा पाटील यांच्या या वक्तव्याची सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू नये. सर्व समाजघटकांना न्याय मिळण्यासाठी शासनाने आधी अचूक आकडेवारी जाहीर करावी.”
— शशिकांत दादा पाटील आर. पी. आय. (आठवले) उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष


