pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिली एकमेकांना गळाभेट

Samrudhakarjat
4 7 7 1 7 4

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ (ईद-उल-अजहा) अत्यंत उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळीच नमाज पठण आणि विशेष प्रार्थना

ईदनिमित्त सकाळी ७:३० वाजता जामा मस्जिद मरकज येथे मुस्लिम समाज बांधव एकत्र आले. तेथून अल्लाहचे स्मरण करत सर्व बांधव मुख्य ईदगाह मैदानाकडे रवाना झाले. ईदगाह येथे मौलाना उबेदुल्ला काझी यांनी उपस्थितांना कुर्बानीचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. त्यानंतर ठीक ८:०० वाजता उपस्थित मुस्लिम समाज बांधवां सोबत मौलाना अब्दुल रहीम शेख यांनी ईद-उल अजहा ची मुख्य नमाज पठण करण्यात आली. नमाजनंतर मौलाना रहीम शेख यांनी खुदबा वाचन केले. त्यांनी देशात व समाजात जातीय सलोखा, शांतता आणि भाईचारा कायम राहण्यासाठी अल्लाहकडे विशेष दुवा (प्रार्थना) मागितली. नमाज संपन्न होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या मुबारकबाद दिल्या. यावेळी हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार

या धार्मिक उत्सवाचे औचित्य साधून राशीन येथील हशु अडवाणी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (आर्ट्स व सायन्स) परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मिसबा असिफ शेख (नालबंद) आणि सानिया जावेद जहागीरदार या मुलींच्या पालकांचा सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.

चोख पोलीस बंदोबस्त

उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने ईदगाह परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक मुळीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुपेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुतार व रायकर, तसेच होमगार्ड अनिकेत जंजिरे, निलेश देवडे, अक्षय जगदाळे, नितीन परकाळे आणि हर्षद गावडे यांनी चोख कर्तव्य बजावले. सर्वांच्या सहकार्यामुळे राशीन शहरातील बकरी ईद अत्यंत शांततेत आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker