भोसे गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी


(कर्जत प्रतिनिधी) :- भोसे गावामध्ये प्रथमच रोकडेश्वर मित्र मंडळाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार-फुले अर्पण करून पूजन करण्यात आले.

यानंतर गावातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण भोसे गाव दणाणून गेले होते. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.
मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमासाठी रोकडेश्वर मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवामुळे गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.



