pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनमधील अमेनिटी स्पेस घोटाळ्यावर मोठा निर्णय!

बेकायदेशीर विक्री रद्द; जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचे आदेश

Samrudhakarjat
4 7 6 5 5 0

कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे बिगरशेती प्लॉटमधील अमेनिटी स्पेस व ओपन स्पेसची शासनाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून झालेली बेकायदेशीर खरेदी-विक्री अखेर प्रशासनाने रद्द केली आहे. उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी संबंधित जागा राशीन ग्रामपंचायतीच्या नावे ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

राशीन येथील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेंद्र सांगळे यांनी १७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री सचिवालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल करून राशीनमधील २७ बिगरशेती आदेशांमध्ये अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारीची चौकशी निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी केली. त्यांनी सखोल तपास करून अहवाल उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्याकडे सादर केला.

दरम्यान, विकासक व खरेदीदारांना तब्बल नऊ महिन्यांची मुदत देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मात्र, गाव दप्तरी नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांवरून अमेनिटी स्पेसची विक्री झाल्याचे स्पष्ट सिद्ध झाले. त्यामुळे योगेंद्र सांगळे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले आणि अखेर प्रशासनाने संबंधित व्यवहार रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

या आदेशानुसार संबंधित अमेनिटी व ओपन स्पेसची जमीन राशीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात येणार असून, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी असलेल्या विकासक, खरेदीदार आणि संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार कारवाई होणार आहे. तसेच संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

योगेंद्र सांगळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राशीनमधील उर्वरित सर्व बिगरशेती आदेशांचीही चौकशी सुरू असून, नियमबाह्य प्रकरणांवर लवकरच कठोर कारवाई होणार आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker