दुरगाव मुस्लिम समाजाचा स्तुत्य उपक्रम; मौलाना साद काझी यांना दीड लाखाची ‘युनिकॉन’ दुचाकी भेट
राशिन मुस्लिम समाजाकडून निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन


राशिन (प्रतिनिधी, जावेद काझी): :- धार्मिक आणि सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या दुरगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. समाजासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे मौलाना साद काझी यांना दुरगाव मुस्लिम समाजाच्या वतीने दीड लाख रुपये किमतीची ‘होंडा युनिकॉन’ टू-व्हीलर गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे.
मौलाना साद काझी यांच्या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना प्रवासासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने समाजाने एकत्र येत ही अनोखी भेट दिली. ग्रामीण भागात अशा प्रकारे आपल्या धार्मिक गुरुंचा सन्मान केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमाची दखल राशिन येथील मुस्लिम समाजानेही घेतली आहे. दुरगाव मुस्लिम समाजाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून, यामुळे समाजातील एकोपा आणि कृतज्ञतेची भावना दिसून येते, अशा शब्दांत राशिन मुस्लिम समाजाच्या वतीने दुरगाव ग्रामस्थांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले आहेत.
यावेळी दोन्ही गावांतील प्रमुख मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



