मिरजगाव येथे सावता महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात…
पालकमंत्री जयकुमार गोरे व सभापती राम शिंदे यांची उपस्थिती


मिरजगाव (प्रतिनिधी) : – संत परंपरेतील श्रमसंस्कृतीचे अधिष्ठान असलेल्या सावता महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी आज शुक्रवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी मिरजगाव येथे भूमिपूजन सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या वेळी सावता महाराज वसेकर सावता परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आबासाहेब खरे, सावता परिषदेचे कर्जत तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ (आबा) गोरे, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस, डॉ. आदिनाथ चेडे, संपतराव बावडकर, अॅड. मेहत्रे साहेब, अंकुश दादा म्हेत्रे, दिलीप गोरे, नाथ गोरे सर, सुधाकर खेतमाळस सर, उद्धव शेठ नेवसे, शंकर गुलाब तनपुरे, डॉ. कोरडे, सारंग घोडेस्वार, अजिंक्य म्हेत्रे, शेखर बनसोडे, धनंजय सातव, राजेंद्र गोरे सर, अमृत लिंगडे, अण्णासाहेब बनकर, सोमनाथ बनकर, अशोक शेलार, अशोक माने, महेश माने, रामदास माने, शिवाजी बापू नवले, धनेश वाघ, किशोर कोल्हे, हनुमंत सातव, डॉ. शुभांगी काकी गोरे, मीनाक्षी ताई फरताडे, शोभाताई गोरे काकी, शारदाताई म्हेत्रे,

देविदास कोल्हे, अविनाश गोरे, निवृत्ती जवणे, धनंजय राजेंद्र कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, यश गोरे, ऋषी खेतमाळस, रमेश आप्पा खेतमाळस, पुजारी महेश काका नंदे, सुगंध घोडके, शांताबाई माने, संगीता माने, बाप्पू कोल्हे, संजय म्हेत्रे, नितीन गणेशा नंद, चेडे महाराज, महावीर पोटे महाराज, तुषार म्हेत्रे, प्रकाश चेडे, रामदास हजारे, चंदू बापू कोल्हे, गुरुजी गणेश माने, संदीप वाघ, मंगेश गारुडकर, शंकर विले, अभिजीत जवादे, संतोष कोरडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सावता महाराजांच्या विचारांचा गौरव करत, “हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र न राहता समाजप्रबोधनाचे व एकतेचे केंद्र बनेल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही मंदिर बांधकामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

मंदिराला शासनाकडून ‘ब’ दर्जा मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी विनंती यावेळी सर्व समाजबांधव व ग्रामस्थांना करण्यात आली. एकजूट, पारदर्शक नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर मिरजगाव येथे भव्य व प्रेरणादायी सावता महाराज मंदिर उभे राहील, असा आशावाद कार्यक्रमातून व्यक्त झाला.



