राशीन परिसरात बिबट्याचे थैमान! नागरिकांमध्ये दहशत.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशिन परिसरात मागील आठ दिवसापासून बिबट्या व तीन बछड्यांनी थैमान घातले असून देशमुखवाडी, कानगुडेवाडी फाटा, सावतामाळी वस्ती, काझी पोल्ट्री फार्म, कुकडी कॉलनी, अशा अनेक ठिकाणी बिबट्या व बछड्यांचे दर्शन नागरिकांना झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या आठवड्यापासून कुठे ना कुठे राशीन परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे वन विभागाची टीम तपास कामी लागली असून मात्र अद्याप वन विभागाला बिबट्या कैद करण्यास यश आलेले नाही. बच्चे कंपनी व महिला या घटनेमुळे भयभीत झाले असून रात्री च्या सुमारास राशीन परिसरात लवकरच सामसूम झालेली दिसून येत आहे.

बुधवारी मध्यरात्री कुकडी परिसरात बिबट्याचे दर्शन सीसीटीव्ही कैद झाले असून बिबट्या व बछडे कुठे ना कुठे राशीन परिसरात दर दिवस दिसून येत आहेत त्यामुळे वनविभागाने तात्काळ दक्षता घेऊन बिबट्या व बछड्यांचे मुस्क्या आवळाव्या अशी मागणी राशीन परसरातून जोर धरू लागली आहे.




