कर्जतच्या पोपटभाऊ कुलथे सराफ सुवर्णदालनात ‘चांदी महोत्सव’; ५५० ग्रॅमचे भव्य पैंजण आकर्षण


कर्जत (जि. अहिल्यानगर) :
मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कर्जत शहरातील विश्वासार्ह नाव असलेल्या पोपटभाऊ कुलथे सराफ सुवर्णदालनात भव्य ‘चांदी महोत्सव’ उत्साहात सुरू आहे. १९७८ पासून सुवर्ण-चांदी व्यवसायात शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिक व्यवहाराची परंपरा जपणाऱ्या कुलथे सराफांनी ग्राहकांसाठी ही खास पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. हा महोत्सव २५ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत सुरू राहणार आहे.

या चांदी महोत्सवात पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील दागिन्यांची झलक आता थेट कर्जतमध्येच पाहायला मिळत आहे. ३ ग्रॅमपासून ते ५०० ग्रॅमपर्यंतच्या शुद्ध चांदीच्या विविध वस्तू येथे उपलब्ध असून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कलेक्शन, पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्स, आकर्षक गिफ्ट आयटम्स आणि पूजा साहित्य यांचा समावेश करण्यात आला आहे. वजनात कोणतीही तडजोड नाही, व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणि शुद्धतेची हमी—हीच या महोत्सवाची ओळख असल्याचे दालन व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
या महोत्सवातील सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे सुमारे ५०० ते ५५० ग्रॅम वजनाचे भव्य ‘डोली पैंजण’. इतके वजनदार आणि दुर्मिळ पैंजण कर्जत शहरात प्रथमच ग्राहकांच्या पाहण्यात आल्याचे बोलले जात असून, महिलांमध्ये या पैंजणाने विशेष उत्सुकता निर्माण केली आहे.

चांदी महोत्सवाचे उद्घाटन कर्जत नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुलथे सराफ परिवाराच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. सुवर्ण बचत योजना, डायमंड महोत्सव, सफाई कामगार महिलांचा सन्मान, तसेच इको-फ्रेंडली गणपती संकल्पनेसारख्या उपक्रमांद्वारे कुलथे परिवाराने व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले. उद्घाटनानंतर महिलांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, आता चांदीच्या दागिन्यांसाठी पुणे, मुंबई, नगर किंवा बारामतीला जाण्याची गरज उरलेली नाही. फॅशनेबल तसेच पारंपरिक सर्व प्रकारची व्हरायटी कर्जतमध्येच मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढत आहे. जोडवी, पैंजण, अंगठ्या, कडे आणि आकर्षक गिफ्ट आयटम्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. “इथे आल्यावर काहीतरी खरेदी केल्याशिवाय बाहेर पडावंसं वाटत नाही,” अशी भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली.
सुवर्णदालन : पोपटभाऊ कुलथे सराफ पत्ता : बाजारतळ, कर्जत कालावधी : २५ डिसेंबर ते २५ जानेवारी



