pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनच्या मोहसीन शेख ची सहाय्यक वनसंरक्षक पदी निवड…

Samrudhakarjat
4 6 5 9 8 5

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वनसेवा राजपत्रित अधिकारी परीक्षेमधून राशीन येथील मोहसीन जब्बार शेख यांची वनसंरक्षक पदी (वर्ग १) पदी निवड झाली असून मोहसीनने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तब्बल 14 वर्षात 32 मुख्य परीक्षा व तीन मुलाखती दिल्या मोहसीन ची ही शेवटची संधी त्याने जिद्द परिश्रम व धैर्य जोपासत शेवटी राजपत्रित वर्ग १ चा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली.

त्याच्या ह्या शेवटच्या अथक प्रयत्नात नियतीला सुद्धा हार मानवी लागली. मोहसीऩेअकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातुन बीएससी एग्रीकल्चर पदवी प्राप्त केली त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरू केला. दरम्यानच्या काळात त्याचे लग्न देखील झाले. त्याला दोन मुल झाली. त्याने शेतीत कष्ट करून देखील अभ्यासाकडे पाठ फिरवली नाही. आई-वडिलांची भक्कम साथ व पत्नीचे पाठबळ यांच्या जोरावर त्याने हे यश खेचून आणले आहे. मोहसीन हा सेवानिवृत्त मंडल अधिकारी जब्बार (भाऊसाहेब)शेख यांचा मुलगा आहे.

मोहसीनने क्लासवन अधिकारी व्हावे ही आई-वडिलांची इच्छा होती. ती त्याने वर्ग एकच्या पदाला गवसणी घालून पूर्ण करीत आई-वडिलांनी मुलासाठी रंगवलेले स्वप्न साक्षात पूर्ण करून दाखवले. त्याच्या या निवडीचे ग्रामस्थांकडून कौतुक व होत असून मित्रांच्या व इतर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनचे बॅनर राशीन मध्ये चौका चौकात झळकत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker