pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

हसू अडवाणी विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 

Samrudhakarjat
4 6 3 1 0 3

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशीन येथील समाज विकास संस्थेचे हशू आडवाणी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन 2012, 2013 च्या दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थीनीचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

   संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सध्या राज्यभरात विविध पदांवर व विविध क्षेत्रात कार्यरत असणारे साठ माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 शाळा व विद्यार्थी हे अतूट नाते जीवनभर जपावे. आपल्याला घडविलेल्या ज्ञानमंदिराप्रती सदर विद्यार्थ्यांची असलेली आपुलकी भारावून टाकणारी आहे असे प्रतिपादन अल्लाउद्दीन काझी यांनी यावेळी केले.

 विद्यालयास या विद्यार्थ्यांनी फर्निचर रुपी वस्तू भेट म्हणून दिली. छोट्याशा इमारतीत शिकून मोठे झालेल्या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीतील तीन मजली इमारत पाहून मोठे समाधान व्यक्त केले. इथून पुढे वेळोवेळी दहावी व बारावीच्या विविध बॅचचे असे स्नेह मेळावे घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 यावेळी शिक्षक कर्मचारी श्री आजिनाथ शिंदे, सतीश शिंदे, मनोहर भारती, सोमनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा कांबळे व रिटा डमरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम राजपूत, समीर मुलानी, शाकीर काझी, जाफर मनेरी, बालाजी बुरटे, गौरी सकुंडे, हर्षदा कांबळे, रूपाली जाधव, अश्विनी काळे, कावेरी ढवण, गौरी पर्वते, अनिता जांभळकर, प्राची काळे आदींनी परिश्रम घेतले. स्नेह भोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker