pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

भारतीय विद्यार्थिनीचा रोबोट थेट युरोपच्या मैदानात! अहिल्यानगरच्या दिया छाजेड हिची आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निवड

Samrudhakarjat
4 6 5 8 8 3

नगर – पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा 2025 मध्ये बारामती येथील विद्यार्थिनी दिया प्रीतम छाजेड हिने प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. भारतभरातून तब्बल 1हजार हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या अत्युच्च दर्जाच्या स्पर्धेत दियाने आपली बौद्धिक क्षमता, नावीन्यता आणि कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली. या उल्लेखनीय यशाबद्दल दियाला ३०हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

              मूळची अहिल्यानगरची असलेली दिया सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशाला येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेली ही बुद्धिमान विद्यार्थिनी आपल्या कर्तृत्वाने आज जागतिक व्यासपीठाकडे वाटचाल करत आहे. लोणी काळभोर येथे झालेल्या समारंभात तिचा विशेष सत्कार करण्यात आला, ज्यात स्थानिक नागरिक, शाळा व्यवस्थापन आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले.

         दियाने तयार केलेला मोबाईलवर ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट हा स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला. आधुनिक शेतीला चालना देणाऱ्या या रोबोटच्या साहाय्याने नांगरणी, पेरणी, फवारणी, तसेच तापमान, हवामानातील बदल आणि वातावरणातील आर्द्रता यांचे मोजमाप करणे शक्य आहे. दियाने तिच्या रोबोटिक मॉडेलचे प्रात्यक्षिक सादर करताना ग्रामीण शेतीशी संबंधित समस्यांवर अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय सादर केले, ज्यामुळे तिच्या संकल्पनेला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली.

        या यशाच्या पार्श्वभूमीवर दियाची निवड आता डिसेंबर २०२५ मध्ये उत्तर युरोप मधील एस्टोनिया देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून दियाचे नाव आता देशभर चर्चेत आहे. तिच्या या प्रवासात तिला आई शितल छाजेड, वडील प्रितम छाजेड, तसेच शाळेतील शिक्षिका आस्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

            दियाच्या यशाने संपूर्ण नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून अनेक मान्यवरांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे एजंट प्रमोद कुमार छाजेड यांची नात असलेल्या दियाने एक नवीन प्रेरणा निर्माण केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणीचे हे यश निश्चितच आगामी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker