शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी पत्रकार दादा शिंदे


जळगाव ता.कर्जत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षपदी पत्रकार दादा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.शनिवार दि.11 ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक प्रकाश नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड प्रक्रियेत ही निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष म्हणून नाना डाडर, नागनाथ लाड, अनिल कोपनर,अमोल शिंदे,राहुल घोडके,शंकर जाधव,हर्षा शेटे, जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी मावळते अध्यक्ष लक्ष्मण शेटे व नवनिर्वाचित कमिटीचा ग्रामस्थांच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्याकडे पत्रकारिता व निवेदन क्षेत्रातील असलेल्या जनसंपर्काच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधा उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दादा शिंदे म्हणाले.
यावेळी विष्णू खटके, परसराम तोरडमल,केशव घोडके,बापू शिंदे,सचिन शेटे, सुनील महादेव शिंदे, सावन शेटे, राम शिंदे,भरत कोपनर,अमोल शिंदे,अनिल जाधव, रवींद्र जवणे, रमेश शिंदे,अजित शिंदे,निलेश जाधव,किशोर शिंदे,दीपक जाधव,अविनाश घोडके, अंकुश शिंदे, सागर शेटे,संदीप सोनवणे, कृष्णा बामणे,नितीन शिंदे,दीपक वाघ, दिनेश शिंदे, प्रदीप अंकुश,सुनील शिंदे, अनिल पवार, स्वप्निल टकले,आकाश शेटे, रामदास टकले,निखिल जाधव,अनिल माने,महेंद्र जाधव,राम जाधव, संतोष उदमले,राजेश तोरडमल,हनुमंत साबळे आदींसह ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते.




