सरपंच विलास निकत यांचा सामाजिक उपक्रम : वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांचा धनादेश


कर्जत (प्रतिनिधी) : गावाच्या विकासासोबतच सामाजिक जबाबदारी जपण्याचा आदर्शवत उपक्रम आंबीजळगाव येथे पाहायला मिळाला. ग्रामपंचायत आंबीजळगावचे सरपंच विलास निकत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत ₹51,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करून वेगळा आदर्श घालून दिला आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी सरपंच बाळासाहेब लोंढे, मेजर बाबा लोंढे, श्रीराम गायकवाड, अजित अनारसे, सागर निकत, रोहित निकत, धर्मराज निकत आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच विलास निकत यांची प्रतिक्रिया “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा क्षण नसून समाजाप्रती कर्तव्य पार पाडण्याची संधी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदतीचा हात देणे हीच खरी समाधानाची बाब आहे. या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे.” – विलास निकत, सरपंच आंबीजळगाव



