प्रगती नर्सरीच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्याची किमया
पेरू-सीताफळ आंतरपीक पद्धतीतून एकरी ८०० कॅरेटचे विक्रमी उत्पादन


कर्जत (प्रतिनिधी):- प्रगती नर्सरीचे संचालक शरदराव तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर तालुक्यातील शेतकरी सुरेश दामोदर ढोणे यांनी पेरू आणि सीताफळाच्या आंतरपीक लागवडीचा यशस्वी आदर्श निर्माण केला आहे. तैवान पिंक पेरू व सीताफळाची एकत्र लागवड करून त्यांनी दुसऱ्याच वर्षी एकरी ७०० ते ८०० कॅरेटचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयोगात ढोणे यांनी आपल्या अडीच एकर शेतात तैवान पिंक जातीच्या पेरूची ७०० व सीताफळाची ७०० झाडे – अशी एकूण १४०० झाडे लावली आहेत. ही लागवड ८ बाय ८ फूट अंतरावर, एक ओळ पेरू व एक ओळ सीताफळ या अभिनव आंतरपीक पद्धतीने करण्यात आली आहे.
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ढोणे म्हणाले की, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे शरदरावजी तनपुरे यांचे कार्य आहे. दर्जेदार रोपे, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर हे उत्पादन मिळाले.

शेतकरी ढोणे यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय प्रगती नर्सरीच्या मार्गदर्शनाला दिले असून, इतर शेतकऱ्यांनीही प्रगती नर्सरीला भेट देऊन ही पद्धत अवलंबावी, असे आवाहन केले आहे.



