pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

संजय शेठ काकडेंची सामाजिक बांधिलकी : वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ…

दादा पाटील पुण्यतिथी कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Samrudhakarjat
4 6 5 4 7 9

कर्जत – रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘दलितमित्र दादा पाटील’ यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजसेवक व प्रसिद्ध कापड उद्योजक काकडे कलेक्शनचे सर्वेसर्वा श्री संजय शेठ काकडे यांच्या वतीने महाविद्यालयात शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम महाविद्यालयातील गरीब विद्यार्थी फंड योजनेअंतर्गत पार पडला. या प्रसंगी संजय शेठ काकडे यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना सांगितले की, “आमच्या वडिलांनी बैलगाडीतून गावोगावी फिरत कापड व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पारदर्शकता, गुणवत्ता आणि सचोटी या तत्त्वांवर हा व्यवसाय वाढला. परिस्थितीचे चटके आम्हालाही सोसावे लागले. म्हणूनच आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणे हे आमचे उत्तरदायित्व आहे.”

कार्यक्रमात बोलताना दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय विविध योजना राबविते. त्याचाच एक भाग म्हणून गणवेश वाटप उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि पालकांनी काकडे कुटुंबाचा आदर्श घ्यावा. गरीब विद्यार्थी फंडास सहकार्य करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा.” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात कमवा व शिका या योजनेचा शुभारंभ तसेच दादा पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी किरण पाटील, सचिन पाटील, नवनाथ बोडखे यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राचार्य श्री. राजकुमार चौरे, मुख्याध्यापक सौ. महेजबीन पठाण आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत डॉ. नगरकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले तर आभार प्राचार्य श्री. राजकुमार चौरे यांनी मानले.

या कार्यक्रमाला रयत संकुलातील सर्व सेवक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत काकडे कलेक्शन व श्री संजय शेठ काकडे यांनी घेतलेले हे पाऊल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker