pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगराजकिय

कर्जत बस आगार तात्काळ सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपोषण…

Samrudhakarjat
4 4 3 4 8 2

(समृध्द कर्जत) : – कर्जत बस आगाराचे लोकार्पण झाल्यानंतरही आगार सुरू न झाल्याने प्रवासी वर्गाला होत असलेल्या प्रचंड गैरसोयीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार व मित्र पक्षांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणीय उपोषण आयोजित करण्यात आले आहे. हे उपोषण दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कर्जत बस स्थानक परिसरात होणार आहे.

या उपोषणात पुढील प्रमुख मागण्या पुढे मांडण्यात येणार आहेत:

1. कर्जत बस डेपोचे लोकार्पण होऊनही तो अद्याप सुरू झालेला नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.

2. कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी प्रवाशांसाठी पुरेशा बससेवेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार आणि कामगार वर्गाचे हाल होत आहेत.

3. विद्यार्थी, शेतकरी व कामगार वर्गाला दररोज बससेवेअभावी तासन्‌तास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या आंदोलनाला शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कर्जत शहर व तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची तातडीने गरज असून, बस आगार सुरू न झाल्यास स्थानिक जनतेचा रोष अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker