pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

एम.प्रकाश ऑईल इंडस्ट्रीज च्या अधिकृत शोरुम चा सोमवारी भव्य शुभारंभ

Samrudhakarjat
4 6 3 1 0 3

(समृध्द कर्जत) :- एम.प्रकाश ऑईल इंडस्ट्रीज या कंपनीच्या अधिकृत शोरुम (आउटलेट) चा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 25 ऑगस्ट, 2025 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता परमपूज्य गुरूवर्य ह.भ.प.दत्तात्रय (तात्या) महाराज अनारसे यांच्या शुभहस्ते शेळके कॉम्प्लेक्स , कर्जत-राशिन रोड, आक्काबाई मंदिराजवळ, भांडेवाडी येथे संपन्न होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मा.आ.प्रा.राम शिंदे साहेब, (सभापती, विधानपरिषद), मा.आ. रोहित (दादा) पवार (सदस्य, विधानसभा), मा.खा.श्री. निलेशजी लंके साहेब, (सदस्य, लोकसभा), कर्जत नगरपंचायत च्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक/नगरसेविका, पदाधिकारी तसेच इतर सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, कृषी व अध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एम.प्रकाश ऑईल इंडस्ट्रीज निर्मित कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले 100 % शुद्ध फिल्टर्ड व आरोग्यदायी शेंगदाणा, सूर्यफूल व करडई या प्रकारचे खाद्यतेल उत्पादने यानिमित्ताने योग्य दरात उपलब्ध होणार आहेत.
सुरवसे बंधू यांनी खाद्यतेलाचा एक नवीन ‘ब्रॅण्ड ‘ तयार केला असून कोल्ड प्रेस तेल संकल्पना कर्जत परिसरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ग्राहकांना रसायनयुक्त रिफाइंड खाद्यतेला पासून होणाऱ्या विविध आजारांपासून वाचवण्यासाठी कोल्ड प्रेस तेलनिर्मिती सुरू करून विक्रीच्या दृष्टीने कर्जत शहरात शेळके कॉम्प्लेक्स, कर्जत-राशिन रोड , अक्काबाई मंदिराजवळ , भांडेवाडी, तालुका- कर्जत येथे अधिकृत आउटलेट (शोरुम) सुरू होत आहे.
सध्या ग्राहकांची सोय व मागणी लक्षात घेऊन शेंगदाणा,सूर्यफूल, करडई आदी प्रकारचे खाद्यतेल या अधिकृत दालनात योग्य दरात मिळणार आहेत.
“कर्जत व परिसरातील तमाम नागरिकांनी या भव्य उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या दर्जेदार खाद्यतेलांचा लाभ घ्यावा” असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker