ब्रेकिंग
राशीन येथील इनुसभाई मुंडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

Samrudhakarjat
4
0
2
3
9
0
राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन येथील सायकल दुकान व टायर पंचर व्यावसायिक इनुस मेहबूब मुंडे(सय्यद) वय वर्ष ( ५२) यांचे आज पहाटे ५.३० वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील प्रेमळ व्यक्तिमत्व व कुटुंबप्रमुख अशी इनुस मुंडे (सय्यद) ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, एक मुलगा तसेच असा परिवार असून सायकल दुकान होलसेल व्यावसायिक रहीम मुंडे (सय्यद) यांचा तो बंधू होत.इनुस मुंडे (सय्यद) यांच्या अचानक झालेल्या हृदयविकाराच्या निधनाने राशिन व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इनुस यांचा अंत्यविधी आज मंगळवार दिनांक.२२/४/२०२५. रोजी सायंकाळी ५ वाजता. मुंडे कब्रस्तान राशीन येथे होईल.