न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये पदवीदान समारंभ संपन्न

कर्जत :- सोमवार दि. २१ एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील नामांकित न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये (पूर्व प्राथमिक) सिनिअर केजी वर्गातील २०२४-२५ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलसी मळकर्णेकर यांनी केले. प्रास्ताविक पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुनंदा कांबळे यांनी केले. या पदवीदान समारंभासाठी वर्षा कदम , कोमल देवमुंडे आणि इतर सहकारी शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच प्रमुख पाहुणे पूजा अंधारे, सोनाली जाधव आणि आरती वारे ह्या होत्या . कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पूजा अंधारे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि प्रशंसा केली. तसेच ते म्हणाले की विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन करणारी कर्जत तालुक्यातील न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनविण्याचे काम या स्कूल मध्ये केले जाते.
तसेच अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी पूर्व प्राथमिक पदवीदान समारंभासारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी कर्जत तालुक्यातील एकमेव शाळा असून या शाळेमधून सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविले जातात असे प्रतिपादन केले आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पदवीदान समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. किरणजी नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. उपस्थितीत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या पदवीधरांनी सुंदर दीक्षांत गाऊन परिधान करून प्रमाणपत्रे स्वीकारली. कार्यक्रमाचे आभार ज्योती थोरात यांनी मानले.