राशीन दौंड उस्मानाबाद रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, व ठेकेदारने गटार फुटपाथ बाबत नियमबाह्य वागु नये.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे दौंड उस्मानाबाद राज्य मार्ग 68 चे काम माननीय लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून गतीने चालू झाले असून सध्या महात्मा फुले चौक ते श्री जगदंबा देवीच्या मंदिरा पर्यंत गटारीचे काम मुख्य बाजारपेठेतून जमाने युद्ध पातळीवर सुरू असून या कामात कोठे कोठे राजकीय शक्तीचा वापर करण्याचा डाव आहे
तो हाणून पाडावा ,असा दुजा भाव न करता सर्वांना समान योग्य तो न्याय गटारी बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांनी द्यावा .तसेच कामावेळी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या दिलेल्या निकषाप्रमाणे समक्ष उभारून कामाची क्वालिटी मेंटेन करून कॉन्ट्रॅक्टर ने ठरल्याप्रमाणे मटेरियल वापरावे. वेळेवर चाललेल्या कामाला मुबलक पाणी मारणे असे दिसत नाही सध्याच्या कामाची परिस्थिती अशी आहे की काम चालू आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत वाकचौरे किंवा राशीन अभियंता वाघमोडे अध्याप चाललेल्या कामाच्या घटनास्थळी दिसतच नाही येथे फक्त कामगार काम करीत आहेत मात्र कुठलाही शासकीय अधिकाऱ्यांची या कामावर कमांड दिसत नाही हे नक्कीच. तसे न होता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी चाललेल्या लक्ष देऊन उत्कृष्ट कॉलिटी चे काम करून घ्यावे अशी राशीन ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.