शासकीय कल्याणकारी योजना हंडाळवाडी गावापर्यंत आणण्यासाठी लढा उभा करणार ; ॲड.डॉ .अरुण जाधव

कर्जत (प्रतिनिधी) :- ग्रामीण विकास केंद्र संस्था व कोरो इंडिया मुंबई या संस्थेच्या संचलित भटके विमुक्त आदिवासी प्रबोधन मेळावा हंडाळवाडी येथे घेण्यात आला. या मेळाव्या मध्ये ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व हंडाळवाडी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य छबाबाई बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी हंडाळवाडी, पाटेवाडी व नवसरवाडी या गावातून मोठ्या प्रमाणात लोकसभागी झाले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रामस्थ व कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संविधानाची प्रस्ताविकेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, नंदु गाडे सर यांनी केले.
सूत्रसंचालन तुकाराम पवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार राहुल पवार यांनी केले. व समारोप राष्ट्रगीत गाऊन केले. अरुण आबा जाधव, सोमनाथ भैलुमे व रमेश राजगुरू आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले हंडाळवाडी मध्ये संविधान आले आणि संविधानाची उद्देशिकाचे उद्घाटन केले हेच मोठे काम आहे. यांची मनोगत झाली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष छबाबाई बंडगर यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अरुण जाधव यांनी शासकीय योजना गावापर्यंत आणण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने मोठा लढा उभा करून शासकीय कल्याणकारी योजना गावात आणून गावाचा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातच नव्हे राज्यात विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणार आहोत यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. हे सगळं करत असताना आपल्याला संविधान सुरक्षित राहणे गरजेचे आहे. संविधानाची सर्वांना जाण असणे गरजेचे आहे. समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्य या चारही मुल्यांच्या आधारे आपण सर्व एकत्र आहोत. या मूल्यांच्या आधारे आपल्याला एकत्रित राहुन पुढे आपला लढा घेऊन जायचं आहे. त्यासाठी या गावातील युवक महिला यांनी एकत्रित येऊन संघर्षासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या गावाला फार जुना इतिहास आहे. या गावातील नैसर्गिक रम्य वातावरण तसेच या गावातील वनदेव मंदिर हे फार प्राचीन आहे. यालाही एक मोठा इतिहास आहे. याच्या माध्यमातून या इतिहासाच्या व नैसर्गिक रम्य वातावरणाचा आपण पुरेपूर वापर करून गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन पुढे जाऊ असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रियंका पारखे, सावित्रा कोळेकर, विमलबाई कोळेकर, लक्ष्मीबाई कोळेकर, महादेव पारखे, प्रभू व्होटकर, अंकुश कोळेकर, महिंद्र कोळेकर, दिपक पारखे, महादेव बंडगर, दिलीप खुडे, विकास पारखे, पोपट बंडगर, सुनिल बंडगर, संभाजी पारखे, सचिन कदम, प्रथमेश पवार, गणेश पवार व विलास बंडगर आधी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच राहुल पवार (GLDP) फेलो, नंदू गाडे सर, रेश्माताई औटी, ऋषिकेश गायकवाड,शितल काळे, अर्चना भैलुमे, शुभांगी गोहेर, दिसेना पवार व काजोरी पवार यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.