सेवा निवृत्त कामगार तलाठी कै. हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम

कर्जत (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी, सेवा निवृत्त कामगार तलाठी तसेच तोरडमल परिवाराचे जावई कै.हनुमंतराव शहाजीराव तनपुरे (वय – ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी चिरंजीव महेश यांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात चांगले कार्य घडून आणले.
कै. हनुमंतराव तनपुरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली, सुना, नातवंडे, उद्योजक महेश तनपुरे व डॉ. नितीन तनपुरे यांचे ते वडील होते, असा मोठा परिवार आहे, गुलाबराव तनपुरे, दत्तात्रय तनपुरे यांचे बंधू होते. प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे यांचे ते चुलते होते. कै. हनुमंत तनपुरे यांनी कामगार तलाठी म्हणून कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात विविध गावात काम केले, पदोन्नती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज केले. श्री क्षेत्र सिदधटेक येथे गुरुवार दि.२८/०३/२०२४ रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम होणार आहे.