महात्मा गांधी विद्यालयात अनोख्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात 28 फेब्रुवारी रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
डॉ.सी.व्ही.रमण यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.सी व्ही.रमण यांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.त्यामध्ये चैतन्य चौधरी, आयुष सुद्रिक समर्थ वाघ, प्रथमेश मोटे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
समाजातील असणाऱ्या अंधश्रद्धा,रूढी,परंपरा, अपशकून यांविषयी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार चौरे यांनी दिली.तसेच विविध प्रयोगांचे सादरीकरण उपशिक्षिका संध्याराणी कदम त्यांनी करून दाखवले. प्राचार्य चौरे यांनी काही पुढील प्रयोग स्वतः करून दाखवले.अंगात येऊन कापूर खाणे,उदबत्तीने शकून-अपशकून पाहणे, तांब्यातून भूत काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे, लिंबातून जाळ,रक्त काढणे,जिभेतून तार आरपार काढणे याबाबत लोकामधे असणारे गैरसमज स्वतः प्रयोग करून दाखवले व याबाबत समाजात कशी अंधश्रद्धा आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम उत्सुकतेने पाहिला.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य लालासाहेब शिंदे,पर्यवेक्षक राजेंद्र गीते,विज्ञान विभागप्रमुख विठ्ठल हजारे,शिल्पा शेलार तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.