ब्रेकिंग
रामगिरी महाराजांवर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल व नितेश राणे यांना तालुका बंदी होताच मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा मागे.

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी.भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान व धर्मगुरू अशी ओळख असणारे मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी अपशब्द वापरून जाणून-बुजून जातीयतेढ निर्माण करून दोन धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केल्याबद्दल व सकल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल शुक्रवार दिनांक २३/८/२०२४. रोजी सकाळी
दहा वाजता कर्जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा चे आयोजन केले होते. परंतु रामगिरी महाराजांवर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्या मुळे तसेच नितेश राणे यांना कर्जत तालुक्यात येण्याची बंदी प्रशासन कडून घालण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याचा कर्जत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ते तहसील कार्यालय, व पोलीस ठाणे काढण्यात येणारा निषेध मोर्चा मागे घेण्यात आला आहे.