राशीन मध्ये कर्जत तालुका मुस्लिम समाजाचा एकदिवशीय ऊनुमी धार्मिक इस्तेमा संपन्न.

राशीन ( प्रतिनिधी):-जावेद काझी.मुस्लिम समाजाचे जगविख्यात धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या भाईचारा व एकात्मतेचा दिलेला धार्मिक संदेश मुस्लिम समाजबांधवांन पर्यंत पोहोचवण्यासाठी राशिन येथे सेव्हन स्टार ऍग्रो फ्रुट्स(एस के कंपनी) कुंभारगाव रोड काझी नगर परीटवाडी राशीन येथे गुरुवार दिनांक.२२/८/२०२४. रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत एकदिवशीय इस्तेमा पार पडला.
यादरम्यान कुरान,नमाज, सामाजिक बांधिलकी, जन्मदात्या आई-वडिलांबरोबर कसे वागावे, त्यांना आनंद ठेवण्यासाठी काय करावे, आई-वडिलांची सेवा केल्याने स्वर्ग प्राप्त होतो तसेच इतर समाजातील नागरिकांसी कसे वागावे, सामाजिक बांधिलकी कशी जपावी, जातीय तेढ, द्वेष निर्माण न करता एकता अखंडता जपण्याचा संदेश दिलेल्या अल्लाह व मोहम्मद पैगंबरन यांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन कसे करावे, आपल्याकडून जाणून बुजून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, समाजा समाजात द्वेष निर्माण होईल असे बोलू नये वागू नये, असा संदेश प्रवचन मौलाना असलम, मुक्ती तौसीफ, हाफीज जुबेर,अ.नगर, मुक्ती अल्ताफ, यांनी यावेळी येथे जमलेल्या मुस्लिम समाज बांधवांना दिले.. या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांच्या खुशालीसाठी सामाजिक व जातीय तेढ द्वेष निर्माण होऊ नये आमन, सुख समृद्ध, भाईचारा ,आबादीत राहण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अल्लाह कडे दुवा मागितली. यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.