भटके विमुक्त व आदिवासी नागरिकत्वाचे पुरावे पालकांपर्यंत पोहचवणार
तुकाराम कातकडे समाज कल्याण निरीक्षक

कर्जत प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील भटके विमुक्त आदिवासी समाजाने नागरिकत्वाच्या पुराव्याचा लाभ घ्यावा यामध्ये जातीचा दाखला आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत व जॉब कार्ड. या नागरिक्तवाच्या पुराव्यापासुन व या लाभापासून कोणीही राहू नये. नागरिकत्वाचे पुरावे प्रत्येक वस्ती पालावरती राबविण्यात यावी असे प्रतिपादन तुकाराम कातकडे साहेब यांनी केले.
सर्व पंचायत समिती व ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येकाला जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड असेल तर त्यांना शासकीय योजना पासून कुणीही दूर ठेवू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा प्रत्येक गावातील ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन या भटके विमुक्त आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे. कोणीही याची हयगय करू नये. हा निर्णय समाज कल्याण आयुक्त यांचा आहे. हे नागरिकत्वचे पुरावे शेवटच्या घटकापर्यंत ही योजना आपण राबवली पाहिजेत. तसेच भटके विमुक्त व आदिवासी शिष्यवृत्तीच्या लाभ घ्यायचा आहे. शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्याला शाळा आहे.
ऊसतोड मजुरांसाठी जामखेड व कर्जत तालुक्यातील गायकरवाडी या ठिकाणीही आश्रम शाळा उपलब्ध आहेत. आपण याचा लाभ घ्यायचा आहे. तसेच हाताला रोजगाराच्या योजनांची माहिती देण्यात आली. यानंतर ग्रामीण विकास केंद्र संस्थेचा सचिवा उमाताई जाधव यांनी आपल्या मनोगतंतून प्रत्येकाने या नागरिकत्वाच्या पुराव्या घेण्यासाठी पुढे येऊन नागरिकत्वाचे पुरावे घ्यायचे आहे. कोणीही या योजनेपासून अलिप्त राहू नये. यासाठी ग्रामीण विकास संस्था गेल्या २० ते २२ वर्षापासून काम करत आहे. यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी शेतीबाबतीत ज्या ज्या शासकीय योजना आहेत. विहीर, पडीत विहीर व ठिबक याविषयी माहिती दिली. पुढे कांबळे साहेब यांनी
पंचायत समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या शेळीपालन, कोंबडी पालन, दोन दुधाळ गाया व पशुखाद्य अशा योजना राबवत आहोत, यासाठी पंचायत समिती किंवा ग्रामीण विकास केंद्र संस्था यांच्याशी संपर्क साधून या योजना घेण्यासाठी पुढे यायचे आहे. ज्या लोकांना या योजनांची माहिती पोहोचत नाही त्यांनी सतत ग्रामीण विकास केंद्र संस्था याच्याशी संपर्कात राहायचं आहे. या कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे निरीक्षक तुकाराम कातकडे साहेब, ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिवा उमाताई जाधव, कांबळे सर, गवळी सर, पंचायत समितीचे जगताप साहेब तसेच निलेश पवार सर, भटक्या विमुक्त तालुका समन्वयक तुकाराम पवार, सोमनाथ गोरे एकलव्य संघटना, महादेव बर्डे, व्यंकट तांदळे, पंडित तांदळे, मच्छिंद्र तांदळे, दिसेना पवार, प्रथमेश पवार, शितल काळे शुभांगी गोहेर, तसेच भटके विमुक्त आदिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.