दादा पाटील महाविद्यालयात होस्टेल डे निमित्त रंगल्या विविध स्पर्धा

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे ‘होस्टेल डे’ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात होस्टेलच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुलींच्या होस्टेल मधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी होस्टेलमधील एकात्मता आणि सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम महाविद्यालय नेहमी करत असल्याचे सांगितले
होस्टेल डे अंतर्गत संगीत खुर्ची, सुंदर सही, सुंदर हस्ताक्षर, खोली सजावट, वैयक्तिक व समूह नृत्य, फॅशन शोमधून क्वीन यांसारख्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेने आणि कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली. विशेषतः समूह नृत्य स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना विद्यार्थिनींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. संगीत खुर्ची स्पर्धेत नेहा तांबे, वैष्णवी दिवसे, स्नेहल बहिर, सुंदर सही स्पर्धेत प्रिया बोराडे, प्रतीक्षा जाधव, श्वेता अनपट, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत समीक्षा वाघमारे, अनुजा कसरे, प्रज्ञा सरवदे, खोली सजावट स्पर्धेत खोली क्रमांक जी ७, बी १७, ए ८, नृत्यामध्ये अंजली गुळवे, वाघमारे ग्रुप (गोंधळ), त्रिवेणी ग्रुप (देशभक्ती), फॅशन शोमधून समीक्षा जगताप क्वीन तर सिद्धी पाडळे, शुभांगी बदे, पूजा मेरगळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीसे संपादन केली
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होस्टेलच्या अधीक्षक डॉ. बेबी खिलारे व होस्टेल समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली आणि त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला. होस्टेल डे हा दिवस सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.