संत सद्गुरु गोदड महाराज यांची समाधी सोहळा – अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तनाच्या सुरांनी गूंजणार कर्जत!

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील बाजारतळ येथे ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदडमहाराज यांच्या १८७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्रितपपूर्ती महोत्सवी वर्ष (२०२५) अंतर्गत ३६ वा अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे प्रेरणास्थान वै. आनंदराव साळुंके गुरुजी, वै. रामभाऊ बाबुराव धांडे (भाऊ), वै. विठ्ठल माऊली तांबटकर असून मार्गदर्शक ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे, ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजीरे यांचे सहकार्य लाभणार आहे.
महोत्सवाचा शुभारंभ आणि ठिकाण
- दिनांक: शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५
- स्थळ: बाजारतळ, मु.पो.कर्जत ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
- मुख्य कार्यक्रमम :- होत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- दैनिक कार्यक्रम: पहाटे ४ ते ६: बाकडा भजन सकाळी ७ ते ७.३०: विष्णुसहस्रनाम सकाळी ११ ते १२: श्री संत गोदडमहाराज चरित्र वाचन सायंकाळी ५ ते ८: हरिनाम कीर्तन
- विशेष कार्यक्रम: दि. ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ५ ते ८ ह.भ.प. संजन महाराज पाचपोर (विदर्भ) यांचे सुश्राव्य श्रीराम कथा निरूपण होणार आहे.
- दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे (निमगाव धाकू) आणि ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर (कोरेगाव) यांचे प्रवचन होईल.
- सांगता सोहळा: रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- हरिजागर आणि कीर्तनसेवा: दि. १५ फेब्रुवारी २०२५: रात्री ९ ते ११: ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सुडके (टाकळी लोणार), ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (अळसुंदेकर), ह.भ.प. भागवत महाराज साळुंके (आळंदी) यांचे कीर्तन रात्री १२ ते पहाटे ४: सामुदायिक हरिजागर व जागर गायकांचा कार्यक्रम.
या सोहळ्यात अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजनकार सहभागी होणार असून, संपूर्ण महोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
भाविकांना आवाहन :- या पवित्र संजिवन समाधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम कीर्तन, प्रवचन आणि भजनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.