शाहू राजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने राशीनचे सेवानिवृत्त आर्मी हवालदार विनोद कदम यांचा सत्कार.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन (कदम वस्ती) येथील, जाबाज निर्भीड,(acp) हवलदार श्री.विनोद चंद्रकांत कदम यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल मा. उपसरपंच शाहू राजे राजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने शाहू राजे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाहूराजे भोसले, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, प्रसाद मैड, पवन जांभळकर, माजी सरपंच बबन घोसे, गणेश कदम, रावसाहेब पंडित, राहुल राजे, दादा जाधव, निलेश पवार, पिंटूशेठ तलरेजा , आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. विनोद कदम यांनी आर्थिक परिस्थिती बेताची नसताना खरतर प्रवास करीत स्व कष्टावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत २००४ साली आर्मी सेवेत भरती झाले.२००४ ते २०२३, आर्मी मध्ये १९ वर्षे देशसेवा केली.
विशेष म्हणजे विनोद कदम यांची संपूर्ण देशसेवा ही जम्मू कश्मीर मध्येच झाली आहे. भारत देशाचे रक्षण करत सेवानिवृत्त झालेल्या (एसीपी )हवलदार श्री. विनोद चंद्रकांत कदम यांचा सेवानिवृत्त समारंभ आज सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा राशिन नजीक संभाजी कदम वस्ती येथे होणार आहे. सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्या नंतर नंतर स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे.