वृक्षवल्ली एकात्मिक विकास संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
रोहित पवार : सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध

कर्जत, (प्रतिनिधी) : – वृक्षवल्ली एकात्मिक विकास संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या अहिल्या पब्लिक स्कूलमधून ज्ञान संपन्न विद्यार्थी घडून परिसराचे नावलौकिक वाढवतील. या संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
चापडगाव येथे वृक्षवल्ली एकात्मिक विकास संस्था संचलित अहिल्या पब्लिक स्कूलच्या प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, संस्थापक अध्यक्ष अॅड. विकास शिंदे, उपाध्यक्ष अतुल शिंदे, सचिव डॉ. आकाश शिंदे, खजिनदार भय्यासाहेब शिंदे, अभियंता वैभव मिसळ, अॅड. उत्तम ढवळे, प्रवीण इंगळे, युवराज लांडगे, किरण घनवट व कार्यकारी संचालक सूरज शिंदे, कवयित्री स्वाती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, उपसरपंच रणजित घनवट, शिक्षक नेते बाळासाहेब सपकाळ आदी उपस्थित होते.
विविध उपक्रमांचे कौतुक
विकास शिंदे म्हणाले, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने गावात नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्यास सर्वांनी सहकार्य केले. यातून गुणवंत विद्यार्थी पुढे येत गाव परिसराचा निश्चित नावलौकिक वाढवतील. स्वाती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. उत्तम ढवळे यांनी आभार मानले.