लाडकी बहीण-साव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

कर्जत (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी गाजली लाडक्या बहिणींनी भरपूर मतदान केल्याच्या महायुतीचा दावा आहे आता हे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याने ते लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी देते यांची उत्कुरता लागली आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही रक्कम असेल की वाढेल याबाबत बहिणींमध्ये चर्चा सुरू आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुदतीप्रमाणे जिल्ह्यात सुमारे ११ लाख ५० हजार महिला पात्र ठरले आहेत पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते एकही हप्ता न मिळाल्याने महिलांना पाच हप्त्याचे एकूण साडेसात हजार रुपये एकाच वेळी दिले गेले दरम्यान आचारसंहिता काळात योजनांचा लाभ घेता येत नसल्याने निवडणुका संपतात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या आश्वासन दिले होते त्यामुळे आता निवडणुका आटोपल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याचे प्रतीक्षा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लागले आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती कडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का, अशीच चर्चा आहे. काहींना तर आपण अपात्र ठरणार नाही ना याची भीती सतावते आहे.