Advertisement
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

दादा पाटील महाविद्यालयात फ्री स्टाईल व ग्रीको रोमन आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा संपन्न

Samrudhakarjat
4 0 1 9 3 7

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांचे संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा दादा पाटील महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी विजयनाना मोढळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन बप्पाजी धांडे, अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव प्रा. राजेंद्र देवकाते, बाळासाहेब साळुंके, पत्रकार गणेश जेवरे, तसेच अहमदनगर जिल्ह्यातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शांताराम साळवे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. शरद मगर, डॉ. मनीषा पुंडे, प्रा. कल्पना बागुल आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.

फ्री स्टाईल कुस्ती व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेले विद्यार्थी यांचे अभिनंदन मान्यवरांनी केले. 

फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेले स्पर्धक, ५७ किलो वजनी गटात अमित कुलाळ (नेवासा) संकेत सतरकर, ६१ किलो वजनी गटात शिवम गरजे (जामखेड) बळवंत ठोंबसे (कोपरगाव), ६५ किलो वजनी गटात ऋषिकेश उचाळे (पारनेर) महेश शेळके (अहमदनगर), ७० किलो वजनी गटात कुमार देशमाने (पारनेर) लतेश टकले (नेवासा), ७४ किलो वजनी गटात मयूर तांबे (बुऱ्हाणनगर) रोहित वाघमोडे (जामखेड), ७९ किलो वजनी गटात सौरभ गाडे (जामखेड) सार्थक वाळुंज (पारनेर), ८६ किलो वजनी गटात धुळाजी इरकर (मिरजगाव) संग्राम भिसे (मिरजगाव), ९२ किलो वजनी गटात शशांक बारगुजे (कर्जत) अनिल लोणारे (पाथर्डी), ९७ किलो वजनी गटात भारत होळकर (बुऱ्हाणनगर) लौकिक चौगुले (अहमदनगर), १२५ किलो वजनी गटात चेतन रेपाळे (पारनेर) ज्ञानेश्वर यलभर (पिंपळगाव पिसा) यांनी यश संपादन केले.

ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये विजेते झालेले स्पर्धकांमध्ये ५५ किलो वजनी गटात रोडगे ओंकार (नेवासा) करपे प्रियज (अहमदनगर), ६० किलो वजनी गटात प्रदीप मेमाणे (राजुर) हर्षद रोहकले (अहमदनगर), ६३ किलो वजनी गटात वैभव क्षीरसागर (श्रीगोंदा) रोशन भोसले, ६७ किलो वजनी गटात अभिजीत वाघुले (नेवासा) आकाश तोरडमल (कर्जत), ७२ किलो वजनी गटात सदगीर भाऊराव (राजुर), स्वप्निल चव्हाण (मिरजगाव), ७७ किलो वजनी गटात शंकर धांडे (मिरजगाव) सुरज चत्तर (अहमदनगर), ८२ किलो वजनी गटात पवन रोहकले (पारनेर) प्रताप बरडे (नेवासा), ८७ किलो वजनी गटात गोवर्धन शिंदे (पारनेर) शुभम भागवत (ढवळपुरी), ९७ किलो वजनी गटात ज्योतिरादित्य कंद (श्रीगोंदा) ओम घुले (श्रीगोंदा), १३० किलो वजनी गटात दिग्विजय भोंडवे (श्रीगोंदा) आदित्य धोत्रे (अहमदनगर) असे यश संपादन केलेले विद्यार्थी आहेत

नाशिक येथे संपन्न होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता वरील विजेत्या स्पर्धकांचा अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आलेला आहे 

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. पवन कडू, प्रा. दिव्या शिलवंत यांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker