नांदगाव जिल्हा परिषद शाळेत भरला चिमुकल्यांचा आनंदी बाजार.

कर्जत (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव येथे आनंदी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे, तसेच गणितातील किलो, डझन, बेरीज, वजाबाकी या संकल्पना स्पष्ट व्हाव्या,त्याच बरोबर मुलांचे सवांद कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला होता.
यावेळी आनंदी बाजारात भाजीपाल्याला चांगला भाव मिळून विक्री व्हावी यासाठी चिमुकल्यांची आगळी वेगळी धडपड पाहायला मिळली. आपल्या वस्तूंचे बाजार भाव खरेदीदारांना मोठ्याने ओरडून ही चिमुकली मुले सांगत होती. विद्यार्थ्यांनी स्वत: बाजार चालवून भाजीपाल्याची विक्री केली. या बाजारात पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, भेंडी, काकडी, मुळा,कांदा, पालक, ,मेथी, आवळा, पेरू, केळी, तसेच कडधान्य,शेव, मुरमुरे याबरोबरच वडापाव, समोसे,भजे, भेळ व शालेय साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
पालक,ग्रामस्थ यांनीही ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.चांगला प्रतिसाद दिला.जवळपास 18-20 हजारांची उलाढाल झाली.या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती ,शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ यांनी सहकार्य केले. या मध्ये मुलाचा अतिशय उत्साह दिसून आला.
शाळेच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे ग्रामपंचायत, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.