राशीन मध्ये भाजपा नूतन पदाधिकाऱी एकनाथ धोंडे व पांडुरंग भंडारे यांचा आ. प्रा. राम शिंदे साहेब मित्र परिवाराच्या वतीने सत्कार.

राशीन (प्रतिनिधी ):- जावेद काझी.भारतीय जनता पार्टीच्या अ. नगर (अहिल्यानगर). जिल्हा उपाध्यक्षपदी राशीन येथील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर हसमुख चेहरा व मनमिळाऊ स्वभावाची ख्याती असणारे माननीय एकनाथ धोंडे तसेच भाजपा कर्जत तालुका (महामंत्री) सरचिटणीसपदी प्रगतशील शेतकरी पांडुरंग भंडारे यांची निवड झाल्याबद्दल आ.प्राध्यापक राम शिंदे साहेब मित्र परिवाराच्या वतीने शिवाजी राजे कॉम्प्लेक्स ऑफिस भिगवन रोड राशीन येथे या भाजपा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी नेते शहाजीराजे राजे भोसले, भाजपा किसान प्रसिद्धी प्रमुख संजय ढगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विलास राऊत, एडवोकेट हरिचंद्र राऊत, तालुका सरचिटणीस सुनील काळे, यांनी एकनाथ धोंडे व पांडुरंग भंडारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत फेटा बांधून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ ,देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना नेते शहाजीराजे म्हणाले प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी एकनाथ धोंडे व पांडुरंग भंडारे दोघांवर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. कर्जत तालुक्याचे राजकारण शेवटी राशीन गटावर येऊन ठेवते हे आतापर्यंतचा इतिहास आहे. आजच्या या भाजपा नवनिर्वाचित सत्कार प्रसंगी सांगू इच्छितो की गेल्या विधानसभेला रोहित पवार यांना राशीन गटातून १४ हजाराचे लीड होते.
आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ३००० आघाडी वर आले आहेत. साधारण १०००० ची घट मतदानात झाली आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मध्ये आपण 3000 घट पार करून अधिक 3000 मते कसे मिळतील याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करू असा विश्वास शहाजीराजे यांनी व्यक्त केला व नूतन पदाधिकारी धोंडे व भंडारी यांना राम शिंदे मित्रपरिवार व राजे भोसले परिवाराच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नेते शहाजीराजे, मा. उपसरपंच दत्ता आंबा गोसावी, एडवोकेट हरिश्चंद्र राऊत,भाजपा तालुका सरचिटणीस सुनील काळे, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष दीपक थोरात, भाजपा प्रसिद्धी प्रमुख संजय ढगे, भाजपा राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे, विलास राऊत, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत पाटील व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संकेत पाटील यांनी केले तर आभार दीपक थोरात यांनी मानले.