ब्रेकिंग
संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष वैभव लाळगे तर शहराध्यक्ष सुनील पवार यांचा समृध्द कर्जत कार्यालयात सत्कार

Samrudhakarjat
4
0
1
8
7
6
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यात पुरोगामी चळवळीत काम करणारे सहकारी वैभव लाळगे यांची संभाजी ब्रिगेड च्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी त्याच बरोबर कर्जत शहरात सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी सदैव अग्रही भुमिका माडणारे सुनिल (पिटुशेठ) पवार यांची कर्जत शहराध्यक्षपदी निवड झाली तर कृषी क्षेत्रातील कामाबरोबरच सामाजिक कामाची आवड असणारे दत्तात्रय भोसले यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाली
या सर्वांचे निवडीबद्दल साप्ताहिक समृध्द कर्जत कार्यालयात सत्कार करुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस महापुरुषाचे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या व महापुरूषाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याची भावना यांच्यापुढे व्यक्त केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक भास्कर भैलुमे, दैनिक लोकमत चे प्रतिनिधी अफरोज पठाण आदी उपस्थित होते.