राशीन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन (प्रतिनिधी ) जावेद काझी. :- कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त राशीन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नीलम साळवे, राजेंद्र देशमुख, शाहू राजे भोसले, विजय मोढळे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शिवध्वजाचे ध्वजारोहण राशीन दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. सभापती श्याम कानगुडे , शहाजीराजे, साहिल काझी,ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, राम कानगुडे, युवराजसिंग राजेभोसले , दीपक थोरात, नाजीम काझी,पवन जांभळकर, गणेश कदम, रवींद्र दामोदरे ,सुभाष जाधव,मालोजी राजे भिताडे, संजय ढगे दादा लोंढे, कॉन्ट्रॅक्टर एकनाथ धोंडे, जालू मोढळे ,यावेळी शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या शिवभक्तीगीतांवर आधारित नृत्य संगीतांवर नृत्य व भाषणे करीत जमलेल्या प्रेक्षकांची व उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
यावेळी राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, महिलावर्ग, इतर क्षेत्रातील मान्यवर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
प्रस्ताविक व सूत्रसंचालन तात्यासाहेब माने यांनी केले.