कर्जतचे नवे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक

समृद्ध कर्जत (प्रतिनिधी) :- पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी कर्जत पोलीस स्टेशनचा पदभार आज स्वीकारला. घनश्याम बळप यांची कर्जत येथून नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्याने त्यांचा कार्यभार मुळूक यांनी स्वीकारला आहे. मुळूक यांनी यापूर्वी हिंगणघाट, सावनेर, नागपूर ग्रामीण आदी पोलीस स्टेशन येथे काम केले आहे.
पोलीस निरीक्षक मुळूक यांचे कर्जत तालुक्यातील विविध संघटना, पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करून स्वागत केले जात आहे. कर्जत तालुका प्रेस क्लब व कर्जत तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक मुळूक यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष माळवे, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप, नगरसेवक तथा प्रेस क्लबचे जिल्हा प्रतिनिधी भाऊसाहेब तोरडमल, मोतीराम शिंदे मुन्ना पठाण, अफरोज पठाण यांनी हा सत्कार केला. सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.