दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडू १० सुवर्ण व २ रौप्य पदकाचे मानकरी
हैदराबाद येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडू प्रतीक्षा कोरे (४५ किलो वजनी गट), ऋतुजा बर्डे (५० किलो वजनी गट), ऋतिका बर्डे (५५ किलो वजनी गट), प्रताप काळे (८० किलो वजनी गट), आकाश तोरडमल (५९ किलो वजनी गट) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच ओमकार डमरे (६५ किलो वजनी गट), अभिजीत धुमाळ (७१ किलो वजनी गट) यांनी रौप्यपदक प्राप्त केले.
मास रेसलिंग स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडू प्रतीक्षा कोरे (४५ किलो वजनी गट), ऋतुजा बर्डे (५० किलो वजनी गट), ऋतिका बर्डे (५५ किलो वजनी गट), आकाश तोरडमल (५९ किलो वजनी गट), ओमकार डमरे (६५ किलो वजनी गट), अभिजीत धुमाळ (७१ किलो वजनी गट), प्रताप काळे (८० किलो वजनी गट) या खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले.
महाविद्यालयाच्या या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ व क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे यांचे मार्गदर्शन लाभले. हैदराबाद येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेमध्ये या खेळाडूंची निवड झालेली आहे. १ ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर स्पर्धा हैदराबाद येथे संपन्न होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.