राशिन येथील नसीम काझी यांचे अल्पशा आजाराने निधन.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन ता.कर्जत येथील नशीम रियाजाेद्दीन काझी वय वर्ष (60) यांचे काल रात्री 10.45 वाजता राशिन येथे राहत्या घरात अल्पशा आजाराने निधन झाले.
आज सकाळी ११ वाजता मक्का मस्जिद कब्रस्तान काझी गल्ली येथे दफन विधी करण्यात आला. यावेळी अँङ. शेवाळे, प्रवीण घुले, राशींनचे उपसरपंच शंकर देशमुख, शाहू राजे भोसले , भीमराव साळवे, भाजपा तालुका सरचिटणीस शेखर खरमुळे , संजय ढगे , मालोजीराजे भिताडे आदींनी यावेळी नसीम काझी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली, यावेळी सचिन पोटरे, रामकिसन साळवे अशोक जंजिरे, अँड. मोगल , पाेपट मोरे , धनंजय मोरे , इतर नातेवाईक ग्रामस्थ तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . गेल्या 40 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात वारसा असलेल्या स्व. मरहुम रियाजाेद्दीन सिराजेाद्दीन काझी यांच्या त्या पत्नी होत्या
तर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मुलुख मैदानी तोफ नावाने गाजलेले भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अल्लाउद्दीन काझी तसेच सल्लाउद्दीन काझी((sk) यांच्या त्या भाभी होत्या
तर भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब काझी, मुन्ना काझी, जोयब काझी, मुलगी सलमा यांच्या त्या मातोश्री होत्या तर साहिल काझी, मोसिन काझी, परवेज काझी, सोहेल काझी, यांच्या त्या चुलती तर त्यांच्या पाठी मागे नातवंडे पाेतवंडे असा मोठा काझी परिवार आहे.