शाहूराजे राजेभोसले मित्र मंडळाच्या वतीने जाबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राशीन येथे सत्कार.

राशिन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे मंगळवार दिनांक ३/10/2023. च्या पहाटे युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या शेजारील हिताची कंपनीचे ए.टी.एम. मशीन चोरीला गेले. चोरी करणाऱ्यांना अवघ्या दोन तासांमध्ये पोलीस प्रशासनाने तातडीने खबरदारी घेऊन मुद्देमाला सहित आरोपिंना पकडून, पिकॶप गाडी आणि ए.टी.एम. मशीन ताब्यात घेतले. या घटनेची तत्काळ चौकशी करून चोरी उघड केल्याबद्दल राशीन ग्रामस्थांच्या वतीने व तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने आणि मा . शाहूराजे राजेभोसले मित्र परिवाराच्या वतीने राशीन मध्ये राजे भोसले यांच्या ऑफिसवर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस पोलीस उपाधीक्षक मा . श्री . विवेकानंद वाखारे साहेब व पोलीस उपाधीक्षक प्रभारी मा . श्री . अरुण पाटील साहेब तसेच . कर्जत तालुका पोलीस निरीक्षक मा . श्री .घनश्याम बळप साहेब आणि कर्जत तालुका पोलीस उपनिरीक्षक मा . श्री . आनंद सालगुडे साहेब आणि त्याच्या समवेत तपासा मध्ये सक्रियतेची भूमिका बजावणारे महाराष्ट्र पोलीस पो.ना.श्री . संभाजी वाबळे.
पो . कॉ . श्री . दिपक कोल्हे . पो . कॉ . श्री . नितीन ढवळे . पो . कॉ . श्री . अर्जुन पोकळे . व राशिन मधील व्यापारी मनोज शेठ, गोविंद जाधव, आजिनाथ मोढळे, संदेश घोसे,अँड सुरेश शिंदे,भारत साळवे,संजय दिकेकर,शिवाजी काळे,निलेश पवार, गोरख सौताडे,सागर सुळ, सुधीर शेठ संचेती, तात्यासाहेब माने,विनोद राऊत, शुभम बोरा इत्यादी पोलीस मान्यवरांनी धाडसी कर्तुत्वामुळे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.