ब्रेकिंग
नगर-सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच ; शशिकांत भंडारे यांचे अपघाती निधन

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
कर्जत (प्रतिनिधी) :- नगर सोलापूर महामार्गावर पाटेगाव येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात शशिकांत गोवर्धन भंडारें उर्फ शाम्पू वय 35 रा. पाटेगाव ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला. अहमदनगर कडून भरधाव वेगाने सोलापूर कडे जाणाऱ्या MH-04,FP 0584
या क्रमांकाच्या आईसर कंपनीच्या टेम्पोने करमाळ्याच्या दिशेनेमो टरसायकल वरती जात असणाऱ्या शशिकांत भंडारे यांच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत शशिकांत हे पाटेगावचे सामाजिक कार्यकर्ते
बाळासाहेब भंडारे यांचे बंधू होते. नगर-सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले असूनही या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सायंकाळी पाटेवाडी फाट्याजवळ मलठण येथील संभाजी
भानुदास खोसे यांचाही वाहन अपघातात मृत्यू झाला.