खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने राशीन मध्ये साखर डाळीचे वाटप! नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

राशिन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- २२ जानेवारी रोजी अयोध्येत भगवान श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठानचे अवचित्य साधत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यातर्फे जगदंबा देवी भक्त निवास येथे राशिन मधील नागरिकांना कुटुंबनिहाय चार किलो साखर, एक किलो डाळ व कॅलेंडरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख, शहाजी राजे भोसले, विक्रम राजे भोसले, कॉन्ट्रॅक्टर एकनाथ धोंडे, धनंजय मोरे, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, सरपंच नीलम साळवे, सोयब काझी, साहिल काझी, दत्ता गोसावी, सुनील काळे, काकासाहेब तापकीर, किशोर मोढळे, प्रसाद मैड, एडवोकेट सौ. प्रतिभा रेणुकर, संभाजी लोंढे, डॉ.आंधळकर, सुनिल यादव, शिवसेनेचे सोमनाथ शिंदे, यांच्या समवेत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, साखर वाटपाचा कार्यक्रम कोणत्या पक्षाचा नसून,
कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात लाडू व्हावेत, तसेच सर्वांना आनंद साजरा करता यावा. त्यासाठी हे वाटप होत असून यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांनी माझ्यापेक्षा जास्त साखर वाटावी.
यावेळी युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख, शहाजी राजे भोसले, सरपंच नीलम साळवे, यांनी भाषणातून खासदार विखे यांनी केले ल्या उपक्रमाचे कौतुक केले. राशीन सह काळेवाडी, कानगुडवाडी, देशमुख वाडी, सोनळवाडी, परीट वाडी, तोरकडवाडी, व इतर गावातील नागरिकांना साखर व डाळ वाटप करण्यात आली. युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तर मालोजीराजे भिताडे यांनी सुत्रसंचलन केले.