दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे वक्तृत्त्व स्पर्धेत सर्वोच्च यश

कर्जत (प्रतिनिधी) :- मिरजगाव येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयात गुरुवार दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयातील कु. भुते रोहिणी संजय हिने प्रथम क्रमांक, कु. शेटे ऋतुजा बाळासाहेब हिने द्वितीय तर कु. गदादे दिक्षा संभाजी हिने तृतीय क्रमांक मिळविला. सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पर्धक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्निल म्हस्के, प्रा. बाळासाहेब धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
वक्तृत्त्व स्पर्धेतील विद्यार्थिनींच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.