युवा संघर्ष यात्रेवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कर्जतमध्ये राष्ट्रवादीतर्फे बंद

कर्जत (प्रतिनिधी) नागपूर येथे युवा संघर्ष यात्रेवेळी झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच एम आय डी सी नामंजूर केल्याच्या निषेधार्थ आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत शहर बंद व रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाला… राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज कर्जत बंदचे आयोजन करण्यात आले होते.
याला कर्जत शहरातील व्यापारी बांधवानी आपली दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला, कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील बेरोजगार युवकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जी संघर्ष यात्रा काढली या यात्रेवर नागपूर येथे लाठी हल्ला करण्यात आला तसेच आमदार रोहित पवार यांनी कर्जतसाठी मंजूर केलेली एम आय डी सी नामंजूरकेली या दोन्ही घटनांचा उपस्थितांनी राज्य सरकार,
उद्योजमंत्री तानाजी सावंत व आमदार राम शिंदे यांचा निषेध केला. कर्जतचे निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी निवेदन स्वीकारले यानंतर रास्ता रोको व कर्जत बंद आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे, जिल्हा सरचिटणीस तात्यासाहेब ढेरे, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, रघुआबा काळदाते, कर्जत नगरपंचायतीचे गटनेते संतोष म्हेत्रे आदींची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, कर्जत नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ, नगरसेवक लालासाहेब शेळके, भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, अभय बोरा, महेश जेवरे, संजय भिसे, दिपक यादव, दादा चव्हाण, नामदेव थोरात, राहुल खराडे, मनोज गायकवाड, सचिन मांडगे, सुधीर यादव आदीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.