संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे स्वागत

कर्जत (प्रतिनिधी) :- भेटी लागी जीवा, लागलिसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी। संत तुकाराम महाराज यांचे अभंग गात संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पालखी सोहळ्याने रविवार (दि. १८) सकाळी कर्जत तालुक्यात प्रवेश केला. कर्जत तालुक्यातील काळवीट अभयारण्य रेहकुरी शेजारील वनदेवी नर्सरी च्या आवारातील पटांगणात श्री संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे सर्व वारकरी व पालखीचे चालक व पदाधिकारी यांचे कर्जत येथील सर्व सोनार समाज व सराफ यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे रेहकुरी येथील वनदेवी नर्सरी मध्ये जेष्ठ भालचंद्र कुलथे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. सोहळाप्रमुख व श्री संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष ह.भ.प रमेश फापाळे महाराज यांचा सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष दीपक शहाणे यांनी समस्त सोनार समाजाच्या वतीने सन्मान केला. या वेळी देवराव शहाणे ,रवीन्द्र बुराडे, संतशिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्याचे सचिव बाळासाहेब दहीवाळ , लक्ष्मण बागडे, , किशोर बोराडे,शंकर शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कुलथे परिवारा तर्फे वनभोजन
कर्जत येथील प्रसिद्ध सराफ अतुल कुलथे यांच्या परिवाराच्या वतीने रेहकुरी येथील वनदेवी नर्सरी मध्ये श्री संत शिरोमणी नरहरी सोनार पालखी सोहळ्यातील सर्व भाविक भक्तांना व कर्जत येथील सोनार समाजातील व मिञपरिवाराला यावेळी महाप्रसाद देण्यात आला. वनदेवी नर्सरी मध्ये महाप्रसादाचे वाटप हे अतिशय सुंदर असल्याने पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी अतुल कुलथे, दीपक शहाणे, किशोर कुलथे, पञकार सुभाष माळवे, संतोष कुलथे, बाळासाहेब कुलथे, नरहरी सोनार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुलथे,राम ढेरे, प्रदीप रुद्रके, रत्नाकर भणगे, डॉ अवधूत काकडे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.