कर्जत शहरासह तालुक्यातील हॉटेल व ढाब्यावर सर्रास अवैध दारू विक्री सुरूच

कर्जत प्रतिनिधी : – कर्जत शहरासह तालुक्यातील हॉटेल व ढाबे सर्रास अवैध दारू विक्री सुरू असताना पाहायला मिळत आहे. परंतु प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येते . याबाबत पोलिस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची अवैधपणे सुरु असलेल्या दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. कर्जत पोलिसांच्या अखत्यारीत येत असलेल्या ढाब्यावर व हॉटेलमध्ये सर्रास अवैधरीत्या दारू विक्री होत आहे. तर मग राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासन या अवैध दारू विक्रेत्यांवर का कारवाई करत नाही. हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडत आहे. कर्जत पोलीस स्टेशनला नवीन पोलीस निरीक्षक हजर होऊन एक महिना उलटला तरीही या अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यावर अजूनही कसलीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा संशय बळावला आहे. त्यामुळे या हॉटेल व्यवसायिकांना नेमका आशीर्वाद कोणाचा आहे हे लपून राहत नाही. या अवैध व्यवसायात काही प्रशासकीय कर्मचारी वसुलीत व्यस्त असल्याचे लोकांना कडुन बोलले जात आहे. त्यामुळे कारवाई फक्त कागदोपत्री केल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाणे काही भागात कारवाई केल्याचे पाहायला मिळते तर काही भागात मोकळीक असे दुटप्पी धोरण जिल्हा यंत्रणा राबवीत आहेत का ? असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांना पडत आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला असलेल्या कोणत्याही हॉटेल ढाब्यावर अवैध देशी विदेशी दारू सहज उपलब्ध होते. त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कर्जत तालुक्यात वाढल्याचे दिसत असून या अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याचे पाहायला मिळत आहेत. या अवैध दारू विक्रीवर कर्जत पोलीस स्टेशनला हजर झालेले पोलीस निरीक्षक कधी कारवाई करतील याकडे सामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
कर्जत शहरासह तालुक्यातील मुख्य रस्त्यावर असलेल्या ढाब्यांवर व हाँटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परमिट किवा परवाना नसतानाही या हाँटेल व ढाब्यांमध्ये सर्व प्रकारच्या देशी विदेशी दारू विक्री होताना पहायला मिळत आहे.
परवाना नसलेल्या हाँटेलमध्ये व ढाब्यांमध्ये सर्व प्रकारच्या दारू सहज उपलब्ध असतात कर्जत शहरातील तर अनेक हाँटेल व ढाब्यांमध्ये या सर्व प्रकारच्या अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय चढ्या भावाने जोरात चालत असल्याची चर्चा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पोलिस यंत्रणेतील काही चोरी छुप्या पद्धतीने आपले हात या गंगेत धुवून घेत असल्याची चर्चा जोरात आहे. मात्र याकडे वरिष्ठ पोलिस यंत्रणेचे लक्ष नाही का ? याबाबत प्रश्न निर्माण होतात तरी या अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कडक कारवाई करण्याची सामान्य जनतेची मागणी आहे.