राजश्री शाहू महाराज हे विसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयामध्ये सिनियर व ज्युनिअर विभागामार्फत राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे व प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास विभागातील प्रा. गौतम राजगुरू यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
प्रा. राजगुरु यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शाहू महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी बहुविध प्रयत्न केले. बहुजन समाजासाठी शाळा व वसतिगृह सुरू केले. स्त्रियांसाठी कायदे केले, १९२३ मध्ये त्यांनी आपल्या संस्थानांमध्ये खेड्यात शाळा सुरू केल्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. कोल्हापूर मध्ये शाहूपुरी गुळाची बाजारपेठ १८१५ मध्ये सुरू केली. आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. राजर्षी शाहू महाराजांचे विविध कार्य त्यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांसमोर मांडले.
याप्रसंगी जूनियर व सिनियर विभागाचे उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. तर आभार उपप्राचार्य खंडागळे यांनी मानले